वपुर्झा ! व. पु. काळे लिखित हे सुंदर पुस्तकं आहे. सुवचने आकाराने लहान पण आशयाने व बोधाने महान असतात. मुखपृष्ठ हे विशेष आकर्षित तर आहे पण त्या मागचा अर्थ सांगताना व. पु काळे लिहितात "मुखपृष्ठावरील हा पेला रिकामा आहे. आकाशाचा शब्द झेलण्यासाठी. मनातली साठलेली जळमट, जळजळ, स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या, म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो. त्या पेल्यात आकाश उतरत. अशाच अनेक कलावंतांच्या, अनेक अविष्कारांसाठी तुम्ही तुमचा मनाचे गाभारे रिकामे, स्वच्छ ठेवलेत. त्यात मलाही जागा मिळाली. पेला पुन्हा रिता झाला. हा पेला त्या आकाशने नित्यनूतन दान स्वीकारण्यासाठी, कायम रिताच राहावा. असा मला आशीर्वाद द्या !" अशा सुंदर शब्दात त्यांनी वर्णन करून त्या मागचा गहन अर्थ सांगितला आहे. यशवंतराव यांच्यासोबतच एक किस्सा सांगून लेखकांनी पुस्तकाची सुरवात केली आहे. त्या नंतर ते लिहितात कि आत्मचरित्र मी कधीही लिहिणार नाही कारण लिहिण्यासारखे खूप नाट्यमय प्रसंग आहेत म्हणून ते नकोच असे त्यांना वाटते. ...