आमचा बाप आन् आम्ही

आमचा बाप आन् आम्ही!

    नरेंद्र जाधव यांनी लिहीलेले मराठीतील बहूचर्चित पुस्तकां पैकी एक म्हणजे आमचा बाप आन् आम्ही!
     या पुस्तकाचा पाच जन आवृत्ती प्रकाशीत झालेल्या असून या पुस्तकाने 'पन्नास हजार' प्रतींचा टप्पा ओलांडला आहे.चौथी आवृत्ती  16नोव्हेंबर 2005 रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या हस्ते विशेष प्रकाशन झाले.
         आजी राहीआई, वडील आणि आईस हे पुस्तक समर्पित करतांना लेखकांनी फार सुंदर वर्णन केलेले दिसून येते.
अनुक्रमे चार भागात पुस्तक विभागले गेले आहे .
       पहिल्या 'मायबाप' या भागात लेखकांनी त्यांची आजी राहीआई बद्दल लिहीले आहे 'राहीआई गं!' असे त्याचे शिर्षक आहे. आजी मुळे त्यांचे कुटूंब कसे मुंबईत आले व स्थायीक झाले.अशिक्षीत आजीने मुंबईत स्वतःला कसे टिकवून धरले यावरुन लेखक म्हणतात की आजीकडे 'नेटिव्ह इंटेलिजन्स' होते ,चातुर्य होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विजीगीषा होती.म्हणून तीला आजी न म्हणता आई म्हणत असे लेखकांना वाटते.आजी नंतर लेखक बोलतात ते आपल्या वडीलां बद्दल की ज्यांना वडील हा शब्द कधीच आवडत नसे."बाप" हा शब्द त्यांना रुचकर वाटे.'आमचा बाप' असे त्याचे शिर्षक आहे. यात लेखकांनी आपल्या वडीलां बद्दल सांगताना विविध प्रसंग सांगून वडीलांच्या कनखर, शिस्तप्रिय,स्वाभिमानी असे अनेक पैलू उलगडले आहेत.वडीलांचा शिक्षणाचा अट्टाहास, मूलांना चांगल्या शाळेत शिकता यावे म्हणून त्यानी केलेली धडपड.  बाबासाहेब आंबेडकरांवरील श्रध्दा.याब्दल या लेखातून कळते.आपल्या आई बद्दल लिहीतांना लेखकांनी आई अडानी असूनही शिक्षणासाठी असलेला तीच अट्टहास विविध प्रसंगातून सांगीतला आहे.घर चालवण्यासाठी तीने घेतलेले कष्ट "मातोसरी" या भागातून लेखकांनी सांगीतले आहे.
भाग दुसरा हे लेखकांच्या वडीलांचे आत्मचरित्र आहे., त्याचे शिर्षक "दादांचे आत्मचरित्र " असे आहे. या भागाच्या सुरवातीला दादांच्या हस्ताक्षराचा नमुना दिलेला आहे.
'लहानपनच्या गोस्टी' या भागात लेखकांच्या वडिलांनी त्यांचा लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत.त्यांनी काढलेले गरिबीतले दिवस त्यांनी त्यांचा शब्दात वर्णन केले आहे.त्यांचा आईने त्यांना कसे मुंबईत आणले तिकडे त्यांनी केलेली कामे त्यांना भेटलेली माणसं याबद्दल त्यांनी या भागात सांगितलं आहे.
'मुंबई नगरीची वळख'या  भागात लेखकांचा वडिलांनी त्यांचा मुंबई नगरीं सोबत नातं कस जोडलं त्याना काय काय अनुभव आले तिकडे जगण्यासाठी केलेली धडपड त्यांनी त्यांचा शब्दात सांगितली आहे. 
'यूरोपेन सायबाच्या संगत' या  भागात युरोपियन साहेबांसोबत राहून लेखकांचे वडील इंग्लिश कसे शिकले हे त्यांनी विविध प्रसंग सांगून रंगतदार बनवले आहे.त्यांच्यात राहून त्यांना इंग्लिश अक्षर ओळख झाली व आडाणी असूनही त्यांना इंग्लिश येत असल्यामुळे नोकरी मिळाली असे ते सांगतात.
'जायपी रेलवईची नवकरी'या  भागात वडिलांना कशी रेल्वेत नोकरी मिळाली व इंग्लिश येत असल्यामुळे त्यांना कशी बढती मिळाली हे यात सांगितले आहे.
'सौसार सुखादुखाचा' या भागात लेखकांचा वडिलांनी त्यांचा सौंसाराची सुरवात कशी झाली त्यांचा लग्नाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे.त्यानंतर त्यांचा बायकोला मुलं होत नसल्याने खूप त्रास सहन करावा लागला तसेच काही काळानंतर त्याना मुलं झाले व त्याच काळात ते अंथरुणाला खिळले त्यातून ते कसे वाचले याच प्रसंग यात सांगितले आहेत. त्या नंतर 1937 मध्ये ते पुन्हा बी.पी. टी रेल्वे मध्ये मारकर म्हणून कामाला लागले आणि मग त्यांचा सौंसार सुखाने सुरु झाला.
'प्रगतीची सुरवाद'या भागात जे डी जधवांचा जन्म झाला व लेखकांचा वडिलांना बढती मिळाली त्या नंतर त्यांनी जे डी जाधवाना चांगल्या शाळेत जाता यावा यासाठी घेतलेलं कष्ट व त्यांना आलेले अनुभव सांगितले आहेत.
तिसऱ्या भाग हा आम्ही म्हणून शीर्षक दिले आहे.त्यात लेखकांचा भावंडांनी त्यांचा आठवणी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.यात पहिला भाग 'वडाळ्याची वस्ती 'या भागात लेखक आपल्या कुटुंबा सोबत चाळीत राहत असत तेथील वडाळ्याची वस्ती कशी होती त्यांना आलेले अनुभव त्यांनी प्रसंगातून सांगीतले आहेत. तिथे वसलेले गुंडांचे साम्राज्य गणपतीतील मज्जा या सर्वांचे प्रसंग सांगितलेलं आहे जे वाचून वडाळ्याच्या परिस्थितीची जाणीव होते. 
त्यानंतर 'आम्ही असे घडलो ' या भागात वडाळ्याच्या वस्तीत राहूनही लेखकांचा वडिलांनी त्यांचावर व भावंडांवर शिक्षणाचे कसे संस्कार केले बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचा आदर्श घालून दिला व शिक्षणाला प्रेरणा दिली. त्यात आलेले अनुभव बाबासाहेबाना भेटण्याची मिळालेली संधी याचे वर्णन या भागात आहे. 
'मी जे. डी. जाधव' या भागात लेखकांचे मोठे बंधू  जिल्हाधिकारी जे डी जाधव यांनी लहानपणापासून त्यांचे अनुभव सांगीतले आहे त्या नंतर जिल्हाधिकारी झाल्यावर आलेले विविध अनुभव सांगितले आहेत. जातीयते मुळे अनुभवायला लागलेले अनेक प्रसंग त्यांनी सांगितले आहेत.तसेच त्यांची काम करण्याची शैली सांगितलेली आहे ते वाचून प्रेरणा मिळते हे नक्की.त्यांनी शेवटी वाडीलाना उद्देशून काही कवितेचा ओळी लिहिल्या आहेत त्या अशा 
'मी, सुधाकर जाधव'  या दुसऱ्या भागात लेखकांचे दोन नंबर चे मोठे बंधू सुधाकर जाधव यांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत ते इतर भावंडान प्रमाणे ते शिक्षणात रमणारे नव्हते. ते कसे शाळा बुडवत व सिनेमाला जात न दादांना कळाल्यावर त्यांना मिळाला चोप त्यांनी प्रसंगातून सांगितलं आहे. ते एस. एस. सी ला असताना त्यांना गाण्याच वेड लागल. त्यांनी तेवा तांत्रिक शिक्षण हा विषय घेतला होता त्यात सोडून इतर विषयात नापास झाले. त्यामुळे रागात त्यांचे वडील त्यांना रेल्वत कामगार म्हणून काम करण्यास घेऊन गेले पण सेलेक्टशन बोर्ड मध्ये असलेल्या इसमाशी त्यांचे भांडण झालेलं असल्याने ते आधीच तिथून पळून जाता त्यानंतर त्यांचा शिक्षकांनी त्यांना कसा सल्ला दिला व कंपनी  मध्ये काम करण्याचे सुचवले न त्या नंतर त्यांनी ट्रेनी टेक्निशियन या कंपनीत कामगार म्हणून लागल्यावर त्यांनी कसा अन्यायाविरुद्ध लढा दिला व  नंतर 1976साली  'गल्फ एअर 'या विमान कंपनी मध्ये काम मिळाले व ते दुबईत गेले. त्यांचा वडिलांना घरात येणाऱ्या परदेशीं वस्तूंचं फार अप्रूप असे विशेषतः सिगारेट चा असं सुधाकर जाधव त्यांचा प्रवास सांगतात.
त्यानंतर मी दिनेश जाधव या पुढचा भागात लेखकांचे तीन नंबर चे बंधू आपले मनोगत अनुभवातून सांगतात त्यांचा व कुटुंबाचा प्रवास या भागात आहे. त्यांचे बालपण कसे हलाखीचं होते त्या नंतर त्यांना जडलेली वाचनाची आवड, व्यायामाची आवडत्यानीं सांगितली आहे. त्यांना लाभलेले शिक्षकांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन याचाही त्यांनी उल्लेख आवर्जून केला आहे. ते कधी काळी 1963मध्ये  बॉक्सिंग चॅम्पियन झालेले. त्या नंतर कॉलेज मधील निवडणुकीत कसे जिंकून आले व कॉलेज ची परंपरा तोडत परीक्षेत पास ही झाले याचे प्रसंग सांगितले आहेत.कॉलेज मध्ये असताना त्यांना लष्करी अधिकारी व्हावेसे वाटत होते पण काही कारणास्तव त्यांचे काम झाले नाही. मग त्यांनी B.S.C. गणित विषय घेतला त्यातून पदवी घेतल्यावर रिचर्डसन हिंदुस्थान कंपनीत त्यांना नोकरी मिळाली.पण ती औरंगाबाद या शहरांत असल्याने त्यांनी टी नोकरी स्वीकारली नाही त्यानंतर थोड्याच दिवसात असिस्टंट म्हणून सचिवालयात त्यांना नोकरी मिळाली. त्यानंतर ते तिकडून स्टेट बंकेत रुजू झाले तेव्हा इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर चा परीक्षेचा फॉर्म भरला व त्यांची निवड ही झाली त्यात त्यांनी त्यांना आलेले प्रसंग सांगितले आहेत त्या  नोकरीत त्यांचे मन न रमल्याने 1974 मध्ये लोकसेवा आयोग तर्फे घेतलेल्य "असिस्टंट डायरेक्टर, सिमेन्स एम्प्लॉयमेंट " या जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधले व त्यांनी फॉर्म भरला व त्यांची निवडही  झाली. मग त्यांना कोलकाता येथे नेमणूक झाली व ते तिकडे स्थायिक झाले.तिकडे त्यांना भेटलेली माणसं आलेले अनुभव त्यांनी सांगीतले आहेत. त्यांची संगितातली आवड भेटलेली मोठी माणसं याचे सुंदर वर्णन यात केलेलं आहे. काही वर्षांनी मुंबई मध्ये त्यांची बदली झाली व महानगरपालिकेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली अशा प्रकारे त्यांनी आपले आयुष्याचा प्रवास थोडक्यात सांगितला आहे. 
त्या नंतर पुढच्या भागात "मी, नरेंद्र जाधव " स्वतः लेखकांनी आपले जीवन कथा सांगितली आहे. नरेंद्र जाधव हे सर्व भावांमध्ये सर्वात लहान आहेत. लिहिताना ते सुरवात करतात ते जेसी जॅक्सन यांचा वाक्याने "मी जिथे येऊन पोहचलो आहे यावरून माझी परीक्षा करू नका, मी कोठून कोठवर आलो आहे ते लक्षात घ्या!" आजही आपण एखाद्या व्यक्ती बद्दलचा पूर्वग्रह आजही त्या व्यक्तीचा जातीवरून ठरवला जातो हे नाकारणे शक्य नाही असे जाधव त्यांना आलेल्या अनुभवातून सांगतात. त्यामागे समाजात खोलवर दडलेली उच्च -निचतेची सुप्त भावना आहे हे त्या मागचे कटू सत्य असल्याचे ते सांगतात. तसेच ते सांगतात कि ज्वलंत इच्छाशक्ती असेल, योग्य संधी उपलब्ध असतील, आणि त्याला कठोर प्रयत्नांची जोड असेल तर काहीही अशक्य नाही. आपले आत्मकथन करण्याचे कारण म्हणजे दलित समाजातील तसेच इतर तरुणांना प्रेरणा मिळावी असे ते सांगतात. 
बालपणीचा त्यांचा प्रवास सांगताना त्यांचे वर्णन ते एक अबोल बालक म्हणून सांगतात. त्यांचे बालपण न्यू कॉलनी चा इमारतीत गेले इतर भावांचा मनाने ते लहान असतानाची घरची परिस्थिती  बऱ्यापैकी चांगली होती. त्या भागातील वातावरण अभ्यास सोडून बाकी सर्व गोष्टींसाठी पूरक होते असे लेखक सांगतात. मालगाड्यातील मालाची लूट करणाऱ्या टोळ्या, इमारतींचा गच्चीवर असलेल्या हातभट्ट्या, सतत मारामारी करणारे लहान मोठे भाई गुंड, तर असे उपद्व्याप करणारे वल्ली त्या काळी त्यांना आदर्श वाटत असे असे लेखक सांगतात तसेच त्या भागातील वर्णन त्यांनी रंगतदार केले आहे. अशा वातावरणात वाढूनही त्यांच्यावर कुठलाही अनिष्ट परिणाम त्या वातावरणाचा झाला नाही असे लेखक सांगतात. 
लेखकांचे प्राथमिक शिक्षण मुंबई पोर्ट ट्रस्ट चा जुन्या वडाळ्याच्या शाळेत झाले. त्यांचा शाळेतून मिडल स्कूल स्कॉलरशिप च्या परीक्षेला बसलेले ते बहुदा पहिले विध्यार्थी होते असे ते सांगतात. इयत्ता पाचवीपासून ते दादरचा छबिलदास शाळेत त्यांना दाखल करण्यात आले. त्यांना शुद्ध मराठी बोलता येत नसल्याने त्यांचा मनात ते वर्गात प्रथम येऊनही आत्मविश्वास नवता. त्यानंतर काही शिक्षकांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास कशी मदत केली व त्यांनंतर त्यांनी कधी पुन्हा मागे वळून पहिलें नाही. त्यांचा मोठा भाऊ त्यांना आदर्श वाटत असे त्यांच्यात वाचनाची आवड त्यांचे मोठे बंधू दिनेश यांनी निर्माण केली. ते 1969मध्ये एस. एस. सी झाले व त्यांनी शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला मात्र त्या स्वछंदी वातावरणात ते हुरळून गेले व भरकटून गेले. मग व्हायचे तेच झाले पहिल्याच वर्षी गुणांची टक्केवारी खाली आली. मग ते सुट्टीत भावाकडे परभणीला गेले तिथे त्यांनी स्वतःचा भविष्याबद्दल विचार केला पुन्हा मित्रांमुळे वाहवत जाऊ नये म्हणून त्यांनी कॉलेज बदलण्याचा निर्णय घेतला. घरापासून जवळ असलेल्या रुइया महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घायचे ठरवले पण मागचा वर्षाचा कमी गुणांवर तिकडे प्रवेश मिळणे शक्य नव्हते. पण लेखक  हट्टाला पेटले होते ते त्यावेळचे प्राचार्य कुलकर्णी यांना भेटायला गेले त्यांना लेखकांनी सर्व सत्य परिस्थिती कथन केली व त्यांना तिकडे प्रवेश मिळाला. पण गणित सोडले तर इतर विषयात त्यांना रस वाटत नसे मग त्यानंतर त्यांचा वाचनात प्रा. वि. म. दांडेकर  आणि प्रा. रथ यांनी लिहिलेल्या  'पॉव्हर्टी इन इंडिया ' हा छोटेखानी ग्रंथ त्यांचा वाचनात आला आणि त्यांनी निश्चय केला कि आता अर्थशासत्राचा अभ्यास करायचे ठरवले.  मग मुंबईला रुइया महाविद्यालयात संख्याशास्त्र -अर्थशास्त्र हा जोडविषय घेऊन बी. एस्सी. साठी प्रवेश घेतला. 1973मध्ये त्यांचे बी. एस्सी पूर्ण झाले. एम. ए. साठी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. प्रथम वर्षाला असताना त्यांनी असेच गंम्मत म्हणून स्टेट बँकेचा प्रोबेशनरी अधिकार्यांचा परीक्षेला बसले विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नात लेखी परीक्षा पास झाले. नंतर मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले आणि ते त्यातही उत्तीर्ण झाले. वयाचा केवळ 21 व्या वर्षी स्टेट बँकेचा अधिकारी ते झाले होते. व त्यांनी एम. एस्सी ही फर्स्ट क्लास ने पास केली. ते विदर्भात नोकरीसाठी असताना रिझर्व्ह बँकेची 'रिसर्च ऑफिसर ' या पदाची जाहिरात आली व त्यांनी अर्ज केला आणि तो एक विक्रम केला. त्यानंतर त्यांनी डॉक्टरेट करण्यासाठी अर्ज केला व 1980साली अमेरिकेत डॉक्टरेट  करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. अमेरिकेत आलेले अनुभव प्रसंगातून त्यांनी सांगितले आहे व त्यानंतर त्यांची होत गेलेली प्रगती त्यांनी या भागात सांगितली आहे. 
त्यानंतर "आम्ही साऱ्याजणी " असे शीर्षक असलेले लेखकांचा पत्नी वसुंधरा यांचा लेख आहे. आंतरजातीय विवाह झाल्यावर त्यांना जातियतेचा आलेला अनुभव त्यांनी यात सांगितलं आहे. तसेच त्याचा जावा घरातील सासू सासरे यांचा सोबतचे अनुभव प्रसंगातून सांगीतले आहेत. 
त्यानंतर पुढचा लेख आहे तो 'जनरेशन नेक्स्ट'  या मुख्य शीर्षकाने त्यात "मी, अपूर्वा जाधव "असा  उपाशीर्षक असलेला एक लेख आहे तो लेखकांचा मुलीचा लेखकांना  2मुले तन्मय व अपूर्वा अशी त्यांचीनावे. अपूर्वाचा जन्म अमेरिकेत झाला. तिचे 9वी नंन्तर चे शिक्षण वॉशिंग्टन इकडे झाले.  त्यानंतर जॉन्स हॉपकिन्स  या मेडिकल  सायन्स या क्षेत्रात नंबर एक असलेल्या  युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवला. घरातली व्यक्तींचा लाभलेला सहवास याबद्दलही या लेखात लिहिले आहे अशा प्रकारे हे पुस्तकं "interesting " आहे 
सगळ्यात शेवटी लेखकांबद्द माहिती दिली आहे. 
ग्रंथाली पब्लिकेशन चे हे  पुस्तकं असून प्रत्येकाला प्रेरणा देईल हे नक्की. 
         

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वतःचा शोधात निघताना!